Kolhapur to Ashtavinayak Darshan Tour

Kolhapur to Ashtavinayak Darshan Tour

Ashta Vinayak Darshan [4 Days Tour]

  • Including Travel Food And Accommodation
  • Call Me : 8888737320

श्री मयुरेश्वर - श्री मोरेश्र्वर ( मोरगाव)

श्री मयुरेश्वर - श्री मोरेश्र्वर ( मोरगाव)

गाभार्‍यातील मयुरेश्वराची मुर्ती अत्यंत आकर्षक आहे. मुर्ती बैठी व डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आहे. मुर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसविले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मुर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस सिध्दिबुध्दीच्या पितळी मुर्ती असून पुढे मुषक व मयूर आहे.

गणपतीसमोर आपल्या पुढ्च्या दोन पायात लाडू घेऊन उभा असलेला एक भला मोठा दगडी उंदीर आहे. तसेच चौथरयावर मोठा नंदी आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेशजयंती) असे दोन मोठे उत्सव होतात. मोरया गोसावी दर शुध्द चतुर्थीला मोरगावला यात्रेला जात असत. आजही माघ शुध्द चतुर्थी व भाद्रपद शुध्द चतुर्थी या दिवशी चिंचवाहून मोरगावला देवाची पालखी जाते.


श्री. चिंतामणी (थेऊर)

श्री. चिंतामणी (थेऊर)

श्री चिंतामणी हे विनायकस्थान पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यातील थेऊर या गावी आहे. हे क्षेत्र अतिप्राचीन समजले जाते. थेऊरला जाण्यासाठी यात्रेकरूनी पुण्याला प्रथम येणे हे चांगले तसेच मोरगाव, थेऊर, लेउयाद्री, ओझर, रांजनगाव हे अष्टविनायकातील पाच गणपती पुण्यापारून जवळ व सोयीस्कर आहेत.

श्री चिंतमणी डाव्या सोंडेचा पूर्वाभिमुख आहे. मांडी घातलेले आसन आहे. मंदिराचा कळस सोन्याचा मुलामा दिलेला आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थी श्री चिंतामणीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणेशभक्त माधवराव पेशवे यांचे देहावसन येथेच झाले.


श्री सिध्दिविनायक (सिध्दटेक)

श्री सिध्दिविनायक (सिध्दटेक)

श्री सिध्दिविनायक हे गणेशस्थान नगर जिल्हयातील कर्जता तालुक्यात सिध्द्टेक या गावी आहे.

श्री सिध्दिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रूंद आहे. मूर्ती उत्तराभिमुखी गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. एक मांडी घातलेली असून त्यावर ऋध्दिसिध्दि बसलेल्या आहेत. प्रभावळीवर सूर्य, चंद्र, गरूड यांच्या आकृत्या असून मध्याभागी नागराज आहे. उजव्या व डाव्या बाजूस जयविजय आहेत.


श्री महागणपती (रांजणगाव)

श्री महागणपती (रांजणगाव)

हे विनायक स्थान पुणे जिल्हयातील रांजनगाव या ठिकाणी आहे. हे क्षेत्र श्री शंकरांनी बसविले असे म्हणतात. पूर्वी याला मणिपूर असे म्हणत. श्री शंकरांनी गृत्समदपुत्राचा, त्रिपुरासुराचा येथेच वध केला.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते, त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते.


श्री विघ्नेश्वर (ओझर)

श्री विघ्नेश्वर (ओझर)

रांजनगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुखी असून मंदिरात दिशासाधन केले आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व मध्यानकाळी गणेशाच्य मूर्तीवर सुर्यकिरण पडतात.

मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमूखी, डाव्या सोंडेची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋध्दि सिध्दि उभ्या आहेत.


श्री गिरिजात्मज ( लेण्याद्री)

श्री गिरिजात्मज (लेण्याद्री)

श्री विघ्नेश्वरास अष्टविनायकात फार मानाचे स्थान आहे. हे अत्यंत रमणीय स्थान म्हणून प्रसिध्द आहे. पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावापासून ८ कि.मी अंतरावर ओझर हे गाव आहे.

श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, पूर्णाकृती व आसन मांडी घातलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके, कपाळावर चकचकित हिरा व बेंबीत खडा बसविला आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजुस ऋध्दि सिध्दिच्या पितळी मूर्ती आहेत. देवाची मूर्ती डौलदार कमानीत आहे.


श्री वरद विनायक (महड)

श्री वरद विनायक (महड)

श्री वरद विनायक हे स्थान कुलाबा जिल्हयातील खालापूर तालुक्यातील महड या गावी आहे. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे.पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे


श्री बल्लाळेश्वर (पाली)

श्री बल्लाळेश्वर (पाली)

पालीचा श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकात अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. हे तीर्थक्षेत्र रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात कर्जत स्टेशनच्या नैॠत्येस सुमारे ३० कि. मी. अंतरावर आहे व पुण्यापासून ११० कि.मी. अंतरावर आहे.

गाभार्‍यात दगडी सिंहासनावर श्री बल्लाळेश्वराची तीन फुटी उंचीची मूर्ती आहे. मूर्ती पुर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या डोळ्यात, बेंबीत चकचकीत हिरे आहेत. मागील प्रभावळ चांदीची असून, त्यावर ॠध्दिसिध्दि चवर्‍या ढाळीत उभ्या आहेत. बाहेर उंदराची मूर्ती मोदक घेऊन गणेशाकडे बघत उभी आहे.